You are currently viewing तुळस येथे काल लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

तुळस येथे काल लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

तुळस येथे काल लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

वेंगुर्ला

तुळस-देऊळवाडी येथे एका घरासहीत पडवीत असलेल्या दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. घरामध्ये जाग्यावर असलेल्या वयोवृद्ध ९० वर्षांच्या आजीला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. ही घटना काल सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली.

तुळस येथील जैतिर मंदिर नजिक रमाकांत उर्फ रविद्र पेडणेकर यांचे राहते घर आहे. या घरामध्ये रविंद्र पेडणेकर त्यांची बायको मेघा पेडणेकर व त्यांची आई लक्ष्मी पेडणेकर असे वास्तव्यास आहे. याच घराच्या पडवीमध्ये पेडणेकर हे आपला तबला व पखवाज यांची दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करतात. तर त्याच पडवीत काहीशा अंतराने सगुण नागवेकर यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. तसेच नागवेकर हे जत्रौत्सवाला खेळणी विकण्याचाही व्यवसाय करतात.

काल सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास अचानक पेडणेकर यांच्या घरामध्ये आग लागली आणि लागलीच त्या आगीने रौद्र रूप धारण केले. हा प्रकार आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घराच्या मागच्या बाजूने घरातील माणसांना तसेच गॅस सिलींडर बाहेर काढले. पेडणेकर यांच्या घरामध्ये त्यांची आई लक्ष्मी पेडणेकर ही वयोवृद्ध असून ती जाग्यावरच असते. ग्रामस्थांनी तिला सुखरूप बाहेर काढले. शॉर्टसर्कीटने आग लागल्याची चर्चा घटनास्थळी होती. या आगीत पेडणेकर यांच्याकडे दुरूस्तीला आलेली व विक्रीस असलेली तबला, पखवाज व त्यांचे साहित्य, तसेच छपरासहीत घराचे तर सगूण नागवेकर यांच्या दुकानात असलेली ज्वेलरी आणि खेळणी मिळून लाखोंचे नुकसान झाले. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाने दोनवेळा बंब नेऊन रात्रौ उशिरापर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, तत्पूर्वी घर आगीमध्ये जळून भस्मसात झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा