You are currently viewing गाय आडवी आल्याने कुंभारमाठ येथे झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी…

गाय आडवी आल्याने कुंभारमाठ येथे झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी…

गाय आडवी आल्याने कुंभारमाठ येथे झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी…

मालवण

दुचाकीने घरी जात असताना गाय आडवी आल्याने तिला धडक बसून झालेल्या अपघातात राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय-५०) रा. आनंदव्हाळ हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान कुंभारमाठ येथे घडला.

याबाबतची माहिती अशी- राजू चव्हाण हे सायंकाळी कुंभारमाठ येथे सुरू असलेले क्रिकेटचे सामने बघण्यासाठी थांबले होते. सामना बघितल्यानंतर ते आपल्या दुचाकीने आनंदव्हाळ येथे घरी परतत होते. याच दरम्यान फोंडेकर दवाखाना लगतच्या रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने त्यांच्या दुचाकीची धडक बसून ते रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे दिसताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तात्काळ अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात अपघाताची माहिती घेतली.

*संवाद मीडिया*

*त्वरा करा…त्वरा करा…त्वरा करा…*

*मालवण व मुंबईमधील एकमेव पब्लिकेशन..*

*सुहासिनी प्रकाशनाची आगामी पुस्तके*

*🔹धुमी* (कादंबरी) रू.200/-
*🔸 मुक्काम मालवण – भरड नाका* (आत्मकथन) – रू. 300/-
*🔹श्रावणसरी* (कथासंग्रह) रू. 200/
*🔸 सांदी – कोपरा* (ललित संग्रह) रु.200/-

*लेखक – चंद्रकांत पारकर.*

*🔹आठवणीतले नामवंत* (लेखसंग्रह) (रु. 500/-)
*श्री. रवींद्र वराडकर*

*वरील पुस्तके गणपती सणापूर्वी प्रकाशित होत आहेत.*

*प्रकाशित होण्यापूर्वी खरेदी केल्यास 50% सवलत*

*▪️सुहासिनी प्रकाशन*▪️

*राजगड बिल्डिंग, करीरोड (प.) मुंबई-400013*

*📲संपर्क – 9821427752 / 7558757752*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130316/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 4 =