उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे प्रमाण रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देण्यात यावे, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतची माहिती सुद्रीक यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून दिली.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, रूग्ण संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांचे पथक सिंधूदूर्गात पाठवावे. तोक्ते वादळामध्ये जिल्ह्य़ात महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो पोल पडले, लाईन तुटल्या जिल्हा पूर्णपणे दहा ते पंधरा दिवस अंधारात होता. अशा परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सिंधूदूर्ग महावितरण कडे पुरेसे मनुष्यबळ नव्हेत. मात्र जिल्ह्य़ातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बारामती कराड, सांगली, सातारा या जिल्ह्य़ातून जादा मनुष्यबळ राज्य सरकारने उपलब्ध करून महावितरणला आणि वीजग्राहकांना जसे सहकार्य केले त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्य़ात कोरोना रूग्ण संख्येत घट झाली आहे. तेथील डाँक्टरांचे पथक जिल्ह्य़ातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाठविण्यात यावे, असे असे म्हटले आहे.