You are currently viewing आंबोलीत वन्य प्राण्याची शिकार, सहाही जणांची जामिनावर मुक्तता…

आंबोलीत वन्य प्राण्याची शिकार, सहाही जणांची जामिनावर मुक्तता…

आंबोलीत वन्य प्राण्याची शिकार, सहाही जणांची जामिनावर मुक्तता…

सावंतवाडी

आंबोली येथे वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी तसेच विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सहाही जणांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची प्रत्येकी ५० हजाराच्या सशर्थ जामीनवर मुक्तता करण्यात आली. या कामी ॲड. परिमल नाईक यांनी काम पाहिले.

फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नांडिस (वय ४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (वय ४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज बाबर खान (वय ३४), रजा गुलजार खान (वय २३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी),अरबाज नजीर मकानदार (वय २६, रा. माठेवाडा) अशी त्यांची नावे आहेत. संबंधित सहाही जणांना आंबोली हिरण्यकेशी येथे शिकार करताना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून बंदुक, सुरा आणि इनोव्हा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

दरम्यान त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आज त्यांच्याकडून जामीना साठी अर्ज दाखल करण्यात आला होता. यावेळी त्यांची प्रत्येकी ५० हजाराच्या सशर्थ जामीनवर मुक्तता करण्यात आली.

*संवाद मीडिया*

🟧*सुवर्णसंधी..*🟧
🟥*इतका कमी व्याज दर पुन्हा नाही..*🟥

सर्वात जास्त विकली जाणारी आणि या श्रेणी मधील ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग सर्टिफ़ाइड एकमेव एसयूवी *टाटा नेक्सोन*
आता ७.९९%* एवढ्या कमी व्याज दराने..

एंट्री मॉडेल पासुन
🔸६ एअरबॅग ,
🔸एलईडी हेडलैंप , टेललैंप आणि डीआरएल ,
🔸इको-सिटी-स्पोर्ट्स या तीन मल्टी ड्राइव मोड ,
🔸सेंट्रल लॉकिंग ,
🔸रिवर्स पार्किंग सेंसर ,
🔸हिल होल्ड असिस्ट,
🔸इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम
आणि मॅाडेल नुसार बरेच काही…

रु.८.१४ लाख ईएसपी पासुन सुरु..

टेस्ट ड्राइव , डेमो आणि एक्सचेंज करीता आजच कॅाल करा
*त्वरा करा..ॲाफर २७ फ़ेब्रु पर्यंतच आणि हजर स्टॉक वर*

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/126757/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा