You are currently viewing जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने

धुम्रपान- आयुष्याची धुळधाण

दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने’ जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आपण आजही अनेकदा रस्त्यात उभं राहून सिगरेट ओढताना, तंबाखू खाताना मुलं -मुली, माणसं पाहतो. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी भारतात सुमारे 10 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.
देशात प्रौढांमध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचं प्रमाण अधिक आहे. पण, आता अल्पवयीनही अशा पदार्थांचं सेवन करताना दिसतात. याच पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो.
देशाचा भावी आधारस्तंभ असलेली ही पिढी व्यसनमुक्तीपासून कोसो दूर आहे.  तंबाखूजन्य पदार्थ बाजारात विकणे, त्याचं उत्पादन, साठवणूक आणि विक्री करण्यावर राज्य शासनाने अनेकदा बंदी घातली. पण, त्यातूनही फारसं निष्पन्न झालं नाही.
भारताला सध्या सर्वांत मोठा धोका म्हणजे तंबाखूसेवनाचा आहे. 13 ते 15 वर्ष वयोगटातील अनेक बालके तंबाखूसेवनाच्या आहारी जातात. लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती असली, तरीही याविषयावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
सध्या शाळांमधून सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवून तंबाखू विरोधी प्रसारासाठी विद्यार्थी व शिक्षक कार्य करत असून यामुळे अनेक कुटूंबे व्यसनमुक्त झाली आहेत.व्यसनमुक्तीसाठी योगदान देत असलेल्या विदयार्थी व शिक्षकांना सलाम फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र भूषण व महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केले जात असून महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तंबाखूमुक्त शाळांचे जिल्हे जाहीर होत असून लवकरच महाराष्ट्र हे जगातील पहिले तंबाखमुक्त शाळांचे राज्य बनविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने एक पत्र व्यसनमुक्तीसाठी,एक पणती व्यसनमुक्तीसाठी ,तंबाखूजन्य साहित्यांची प्रतिकात्मक होळी इत्यादी उपक्रमांची शाळांमधून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.
तंबाखूच्या अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, ॲन्टबीन, ॲपनाबेसीन अशी रसायने असतात. तर भारतीय तंबाखूत मर्क्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम अशी विषारी रसायने असतात. त्याशिवाय तंबाखूच्या धुरात आणि डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया अशी रसायने असतात.

तंबाखूमुळे होणारे आजार

तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशयाचा इत्यादीचा कर्करोग होऊ शकतो.
तंबाखूत असणाऱ्या निकोटीनमुळे मेंदूचे कार्य मंदावते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते.
शासन तंबाखूविरोधात अनेक कायदे करत आहे. पण, त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याने तंबाखू खाणाऱ्यांचं आणि तंबाखूमुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी 31 मे ला ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा करण्यात येतो आणि जगभरात या निमित्ताने या विषयावर मोर्चे, प्रदर्शनं आणि अन्य माहितीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी WHO ने ही ‘टोबॅको- अ थ्रेट टू डेव्हलपमेंट’ हा विषय निवडला.
तंबाखूत निकोटीन नावाचं रसायन असतं. जे तंबाखू खायची आपल्यात इच्छा जागृत करते. तंबाखूचं सेवन हे फक्त कर्करोगालाच आमंत्रण देत नाही तर, दुसरे आजारही तंबाखूमुळे होऊ शकतात.
तंबाखूसेवनाच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती गरजेची आहे. एखाद्या व्यक्तीला तंबाखूचं व्यसन असेल तर त्या व्यक्तीला ते व्यसन सोडायला लावणंं फार कठीण असतं. त्यामुळे तंबाखू व्यसन मुक्ती केंद्रदेखील असतात. तसंच वेगवेगळे प्रकारचे शिबीर राबवायला पाहिजेत. त्यातून जनजागृती केली पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या तरच 30 ते 40 टक्के तोंडाचा कर्करोग असणारे रुग्ण कमी होतील. फक्त तंबाखूच नाही तर गुटखासुद्धा अपायकारक असतो. त्यावरही योग्य तो प्रतिबंध घातला पाहिजे.
महाराष्ट्रात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना दिसून येते. 2012 -2013 मध्ये जिल्हास्तरीय सर्वेक्षणात राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखूसेवनाचे व्यसन आढळून आले आहे. दरवर्षी जगात तब्बल 60 लाख नागरिकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. 2030 पर्यंत हा मृत्यूचा आकडा 80 लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.        मोठ-मोठ्या शहरातील तरुणांमध्ये फॅशन म्हणून तसेच आधुनिक जीवनशैलीमध्ये कामाच्या ताण-तणावामुळे धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे, हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.
सौजन्य :- गुगल सर्च 

लेखन:- श्री जे .डी .पाटील
केंद्रशाळा बांदा नं .१ ता. सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nineteen =