You are currently viewing राष्टवादीच्या दादाना काँग्रेसच्या नानांचा धक्का

राष्टवादीच्या दादाना काँग्रेसच्या नानांचा धक्का

सावंतवाडीत राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सावंतवाडीत जोरदार धक्का दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे पदाधिकारी अस्लम खतिब, राजू धारपवार, नवीन गावकर, असीम वागळे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात सावंतवाडीत होणाऱ्या नगरपालिका निवणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला जोरदार धक्का आहे. यावेळी बोलताना राजू धारपवार म्हणाले आम्ही प्राथमिक स्वरूपात काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे लवकरच जिल्ह्यातील अनेक पदाधिका-यांचा प्रवेश काँग्रेस पक्षात होणार आहे.यावेळी शहर अध्यक्ष अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, सच्चिदानंद बुगडे इत्यादी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 10 =