मुंबई :
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि कोरोना मुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मुंबईत भाजपच्या वतीने सर्वत्र रक्तदान शिबीरांचे आयोजन सुरू आहे. आज लालबाग येथे भाजपा मुंबई उपाध्यक्ष राजेश हाटले यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भाजपचे प्रदेश सचिव मा. खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. या शिबिरात ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.