You are currently viewing श्री सद्गुरू साटम महाराजांची पुण्यतिथी उत्सवात साजरी…

श्री सद्गुरू साटम महाराजांची पुण्यतिथी उत्सवात साजरी…

सावंतवाडी

आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांची 86 वा पुण्यतिथी उत्सव गुरुवारी भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला यावेळी प्रत्येकाच्या तोंडी साटम महाराजांचा जयघोष दिसून आला.

आंबोली बेळगाव महामार्गाला लागून श्री साटम महाराज यांचे समाधी स्थळ तसेच त्यांचे निवासस्थान आहे या ठिकाणी दरवर्षी साटम महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो योगीयांचे योगी असलेल्या सद्गुरु श्री साटम महाराज यांचे भक्त सर्वदूर आहेत दाणोली नगरीत उत्सवानिमित्त दरवर्षी या भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते यावर्षीही सर्व भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला.
उत्सवानिमित्त गुरुवारी सकाळपासूनच दाणोली नगरीमध्ये भक्तांची हजेरी लागली होती समाधी मंदिर परिसरात तसेच साटम महाराज यांच्या निवासस्थानी भक्तांची गर्दी होती प्रत्येकाच्या मुखात महाराजांचा जयजयकार ऐकू येत होता दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी समाधी मंदिर ट्रस्ट कडून भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते हे समाधी स्थान महामार्गाला लागून असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचा अतोनात प्रयत्न होत होता मात्र दुपारी महाप्रसाद असल्याने भक्तांची प्रचंड गर्दी लोटली होती. दिवसभर मंदिरात भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू होते रात्री पालखी प्रदर्शना तसेच अन्य कार्यक्रमाला ही भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा