You are currently viewing मालवणात मनसेने केले १०० कुटुंबीयांना धान्यवाटप

मालवणात मनसेने केले १०० कुटुंबीयांना धान्यवाटप

वादळामुळे छप्पर उडालेल्या घरांनाही मनसेने केले पत्रे व कौलांचे वाटप

मालवणातील मुंबईस्थित पदाधिकार्‍यांचा पुढाकार

मालवणात मनसेचे मदत कार्य सुरूच आहे.तोक्ते चक्रीवादळ व कोरोनाची दुसरी लाट यामुळे मालवणात अनेक कुटुंब आर्थिक विवंचनेत आहेत.तालुका व शहरातील नागरिकांसाठी मनसेही सरसावली आहे.

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर यांनी पेंडुर,पोईप,विरण,कोळंब,सर्जेकोट,वडाचापाट,माळोंड,मसदे,मसुरे,वेरली या गावातील तसेच शहरातील १०० कुटुंबांना घान्य वाटप केले.यावेळी प्रत्येक कुटुंबाला ५ किलो तांदुळ, ४ किलो गहू,१ किलो साखर,१ तेल पिशवी,पाव किलो चहापावडर,१ मीठ पिशवी आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.सदर धान्य वाटप शहर अध्यक्षा भारती वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.वादळामुळे छप्पर उडालेल्या घरांनाही मनसेने पत्रे व कौलांचे वाटप केले आहे.

तालुका सचिव विल्सन गिरकर,शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, नितिन खानोलकर, महिला शहर अध्यक्षा भारती वाघ, गोपाळ शेलटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा