ओरोस येथील विशाल जाधव प्रकरणातील “त्या” ऍम्ब्युलन्सवर तात्काळ कारवाई करा
मनसेची उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदूर्ग :
सौ.प्रणाली बांदिवडेकर रा. मुंबई यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ओरोस येथील विशाल जाधव प्रकरणी उद्धट वर्तवणुक एम्ब्युलन्स दलालीची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.राजेंद्र सावंत यांची भेट घेऊन केली आहे. मनसेच्या निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे गाडी क्र . MHO7AJ0153 ही गाडी कोविड प्रेत वाहतुकीसाठी शासनाने अधिग्रहित केलेली असून सदर गाडीमार्फत एम्ब्युलन्सची दलाली करणे, ज्यादा रेट सांगून रुग्णांच्या नातेवाईकांना छळणे,लुबाडणूक करणे असे प्रकार होत असल्याने तीची नोंदणी रद्द करून नवीन निविदा मागवून एम्ब्युलन्स नम्र बोलणाऱ्या आणि सेवाभावी पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तींना अॅम्ब्युलन्सचा ठेका देण्यात यावा.
त्याचप्रमाणे त्याच्याकडे दुसरी गाडी असून गाडी क्र . MH06AJ5536 सदर गाडी शासनाने आरोग्य विभागाची वापरलेली गाडी भंगार लिलावातील असून ती अॅम्ब्युलन्स करिता नोंदणी केलेली असून सदर गाडी ही ४ ऑगस्ट २००६ ची नोंदणीकृत असून शासनाने त्या गाडीचा भंगार लिलाव करून ती गाडी अॅम्ब्युलन्स म्हणून त्याची नोंदणी करून घेतली आहे . त्या गाडीला १४ वर्षे ९ महीने २० दिवस झालेले असून अशी गाडी अॅम्ब्युलन्स म्हणून वापरल्यास सदर गाडीचा बिघाड रस्त्यात झाल्यास अॅम्ब्युलन्समधील रुग्ण दगावू शकतो . त्यामुळे या गाडीचे अॅम्ब्युलन्स म्हणून नोंदणी रद्द करून १५ वर्षांनंतर त्या गाडीचा वापर होण्यास मज्जाव करावा . त्याप्रमाणे वरील दोन्ही गाड्यांवर कारवाई करून देवगड येथे पाठवलेली गाडी क्र . MH01BS0104 ही गाडी अॅम्ब्युलन्स असूनही कोविड पेशंट वाहतुकी करण्यासाठी असता त्या गाडीचा इन्शुरन्स नाही ही बाब अत्यंत गंभीर असून वरील दोन्ही गाड्यांवर नोंदणी रद्द करण्याची कारवाई करावी असे मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत दुसऱ्या एका फोन संभाषणानुसार सदरील व्यक्ती जाधव हा आरटीओ व पोलीस अधीक्षक कार्यालय मॅनेज केल्याची बतावणी करून शासना विरोधात बदनामी करत असल्याने याचीही दखल घेण्यात यावी असे मनसेने म्हटले आहे. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, सचिव राजेश टंगसाळी,संतोष कुडाळकर, संतोष सावंत, प्रशांत उपरकर,शांताराम साघये आदी पदाधिकारी उपस्थित होते.