You are currently viewing वैभववाडीत अल्पवयीन युवतीची आत्महत्या

वैभववाडीत अल्पवयीन युवतीची आत्महत्या

वैभववाडी
वैभववाडी बाजारपेठेतील साक्षी दीपक सोनुले वय 17 या अल्पवयीन मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. मुलीचे वडील दिपक आनंदराव सोनुले यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली आहे.

दुपारी घरात कोणीही नसताना घरातील लोखंडी बारला स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्ये मागच नेमक कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस माधुरी आडुळकर करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा