You are currently viewing १ जून पासून सुरू होणार अनलॉक…

१ जून पासून सुरू होणार अनलॉक…

अर्थात काय सुरू आणि काय बंद राहणार?

लॉकडाऊन हा शब्द जरी ऐकला तरी पोटात धडकी भरल्याशिवाय राहत नाही… 1 जून पासून अनलॉक च्या प्रक्रियेला प्रारंभ होतोय एकूण तीन टप्प्यात अनलॉक केला जाईल 3जून ,5 जून , आणि 8जून असे टप्पे असतील… केंद्र सरकार सह राज्य सरकारच्या माहितीनुसार अनलॉकच्या या प्रक्रियेत बऱ्याच उद्योगधंद्यांना शिथीलता देण्यात आली आहे… एकूण तीन टप्प्यात मिळणार्‍या या अनलॉक प्रक्रियेबद्दल राज्य सरकारच्या काय सूचना आहेत त्या जाणून घेऊया… कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत…

▪️अनलॉक प्रक्रियेचा पहिला टप्पा.. 3 जून पासून

1)सायकलिंग ,जॉगिंग , वॉकिंग आणि रनिंगला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.

2)समुद्रकिनारे सोसायटी आणि बागेत व्यायाम करत येणार.

3)वैयक्तिक कार्यक्रमांना परवानगी परंतु सामाजिक कार्यक्रमांना बंदी सकाळी 5 ते सायंकाळी 7वाजेपर्यंत त्याला परवानगी देण्यात आली आहे.

4) फक्त जवळच्या मैदानात व्यायाम करायला परवानगी आणि सायकलींचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला.

5) प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कामगारांना नियम परवानगी देण्यात आली आहे.

6) परवानगी घेऊन गॅरेज मध्ये गाड्या दुरुस्त करता येणार.

▪️अनलॉक प्रक्रियेचा दुसरा टप्पा… 5 जून पासून

1)मोठमोठे मॉल्स ,शॉपिंग सेंटर ,शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता अन्य सर्व दुकाने चालू राहणार.

2)कपड्यांच्या दुकानात असणाऱ्या ट्रायल्स रूमवर बंदी असेल.

3) कपड्याच्या दुकाना तून एकदा खरेदी केलेली कपडे बदलून मिळणार नाहीत किंवा परत ही घेतली जाणार नाही.

4)दुकानांनी होम डिलिव्हरी टोकन सिस्टीम मार्किंग सह आणि मास्कचा वापर योग्य प्रकारे करायचा आहे.

5) शॉपिंग साठी वाहने वापरण्यावर बंदी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा असा सल्ला.

6) सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर बसवल्या दुकाने सक्तीने बंद करण्यात येणार.

7) अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा-टॅक्सी कॅप फोर व्हीलर आणि टू व्हीलर ही चालेल.

8) रिक्षा फोर विलर आणि टॅक्सीत 3 माणसांनाच प्रवास करता येणार

▪️अनलॉक प्रक्रियेचा तिसरा टप्पा…8 जून पासून

1) दहा टक्के कर्मचाऱ्यांसह खाजगी कार्यालय सुरू राहतील.

2) घरी आणि ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सॅनिटायझर बंधनकारक राहील.

3)स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारचे सामूहिक कार्यक्रम होणार नाहीत.

4) टू व्हीलर वर एक व्यक्ती थ्री व्हीलर वर तीन व्यक्ती आणि फोर व्हीलरमध्ये तीन व्यक्ती अशाप्रकारे खाजगी वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.

5) 50 टक्के क्षमते सह जिल्ह्यांतर्गत बस वाहतूक सेवा सुरू राहील आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी नाकारण्यात आली आहे.

6)सकाळी नऊ ते पाच अशा वेळेत सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सर्व दुकाने उघडी राहतील.

अशा प्रकारे येत्या एक जून पासून प्रक्रियेला प्रारंभ होईल. 3 जून, 5 जून, 8 जून या तीन टप्प्यात ही प्रक्रिया अवलंबण्यात येईल. लवकरच नव्या जीवनाचा श्रीगणेशा करण्यात येईल असे मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन करणे हा एक भाग असून लॉकडाऊन उघडणार हा दुसरा भाग आहे. 1 जूनपासून या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे असेही ते म्हणाले….!!!

This Post Has 2 Comments

  1. Abid Ali

    Its a fake news i thik coz there is no containment zone other specified this.. same was last year in 2020year . Its old news of 2020

प्रतिक्रिया व्यक्त करा