You are currently viewing दोडामार्ग कोविड सेंटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मार्फत थर्मल गन, ऑक्सिमीटर, स्टीमरचे मोफत वाटप!

दोडामार्ग कोविड सेंटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मार्फत थर्मल गन, ऑक्सिमीटर, स्टीमरचे मोफत वाटप!

राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सरचिटणीस परशुराम (जीजी) उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या मार्गदर्शनाखाली, म.न.वि.का.से. कार्याध्यक्ष सुमंत तारी यांच्या सहकार्याने, दोडामार्ग कोविड सेंटरमध्ये थर्मल गन, ऑक्सिमीटर, स्टीमर(वाफेचे मशीन) तेथील वैद्यकीय अधिकारी मनसे महिला सेना उपाध्यक्ष, नगरसेविका सौ.अनिषाताई माजगावकर, दोडामार्ग संपर्कअध्यक्ष अमोल देसाई, लालबाग-परळ शाखाअध्यक्ष निलेश इंदप, देवगड सहसंपर्क अध्यक्ष संतोष मयेकर, महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम यांच्या उपस्थितीत सदर परिस्थितीचा आढावा घेऊन देण्यात आले.
दोडामार्ग कोविड सेंटर मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 2 =