You are currently viewing घरपोच दारू सेवेला राज्य उत्पादन शुल्क खात्याची परवानगी..

घरपोच दारू सेवेला राज्य उत्पादन शुल्क खात्याची परवानगी..

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका काय?

कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून त्यानंतर औषधे, कृषी उपयोगी वस्तू, घर बांधणीसाठी लागणाऱ्या सामानाची दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून परमिट रूम, व वाईन शॉप धारकांना घरपोच दारू पुरविण्याची परवानगी दिली असल्याचे दारू व्यावसायिक व बार मालकांचे म्हणणे आहे.
एकीकडे धंदे उद्योग बंद असल्याने बेकारी वाढली आहे. त्यात व्यसनाधीन व्यक्तींच्या दारू पिण्यामुळे गोरगरिबांच्या घरी अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे, त्यात घरपोच दारू मिळू लागल्या मुळे सावंतवाडी शहरात घरांमध्ये कलह निर्माण होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी घरपोच दारू सेवेवर निर्बंध आणावेत अशी मागणी सावंतवाडीतील जागरूक नागरिकांनी केली आहे. काही सोसायटी पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात सापडल्या असून तशा नोटिसा गेटवर लावण्यात आल्या आहेत, परंतु सकाळ, दुपार,रात्री दारू सोसायटीच्या आत जात असल्याने एकोप्याने राहणाऱ्या सोसायटी मध्ये वाद होत आहेत. घरात बसून दारू पिण्याची संस्कृती वाढत असल्याने कुटुंबात कलह निर्माण होत आहेत.
सावंतवाडीत रस्त्यावर दारू पिणाऱया तरुणांवर कारवाई करणारे मुख्याधिकारी जावडेकर यांनी शहरात चुकीचा पायंडा पडत असल्याने याकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोना सावंतवाडी वाढत असतानाच दारू पिणाऱ्यांमुळे आणि दारू पोचवणाऱ्यांमुळे शहरात संसर्ग वाढून पुन्हा एकदा शहर कडक लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा