You are currently viewing वेंगुर्ले शहरातील चार दुकानांवर कारवाई

वेंगुर्ले शहरातील चार दुकानांवर कारवाई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार सध्या वेंगुर्ला शहरात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी अशी सूचना आहे. तरी पण गेल्या चार पाच दिवसांत वेळेनंतर दुकाने सुरू ठेवलेल्या चार दुकानांवर वेंगुर्ला नगरपरिषदने कारवाई केली असून दुकानदारांकडून 1800 रूपये एवढा दंड वसूल करण्यात आला.

जिल्ह्य़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे . बाजारपेठ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावी अशी जनजागृती करून देखील दुकाने अकरा नंतर सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून 1800 ₹ दंड वसूल करण्यात आला.

खर्डेकर रोड येथील एक, पिराचा दर्गा येथील दोन, दाभोली नाका येथील एक आणि भटवाडी येथील टाइल्सच्या दुकानावर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + two =