You are currently viewing काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा अभ्यासपूर्ण

काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा अभ्यासपूर्ण

मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री यांचा दौरा?….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर कोंकण दौरा केला, तीन तासांच्या दौऱ्यात मालवण किनारपट्टीसहित आजूबाजूची माहिती घेत आवश्यक सूचना करून ते मुंबईकडे रवाना झाले. मालवण वगळता देवगड, वेंगुर्ल्याकडे त्यांनी जाण्याचे टाळले. दोन दिवसात नुकसानभरपाई देण्याचेही त्यांनी सांगितले. देवगड आनंदवाडी बंदर सर्वात सुरक्षित मानले जाते, परंतु तौक्ते चक्रीवादळाचा फटका देवगड बंदरालाही बसला. दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला तर किनारपट्टीच्या आजूबाजूचे अनेक लोक बेघर झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडून बऱ्याच आशा होत्या.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठा लवाजमा सोबत घेत दौरा केला. सोबत प्रवीण दरेकर देखील होते. परंतु सरकार वर टीका करण्याखेरीज दौऱ्याचे फलित काहीच दिसले नाही. सरकार कडून मदत मिळवून देण्याचेही ठोस आश्वासन मिळाले नाही. परंतु मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा किनारपट्टी भागातील दौरा मात्र अभ्यासपूर्ण होता. धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे प्रस्ताव तीन चार कोटींचे बनवून मलमपट्टी करून बोळवण करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी चारशे कोटींचा प्रस्ताव तयार करण्याचे त्यांनी आदेश दिले. “आम्ही निधी तुमच्या किंवा आपल्या खिशातील देत नाही आहोत. असे सांगत चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी खडे बोल सुनावले. कोरोनामुळे जिल्ह्यात अनेक मृत्यू होत आहेत, त्यामुळे यापुढे कोरोनाने मृत्यू होता नये, बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

रविवारी विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवगड येथील आनंदवाडी बंदराला भेट दिली. नाना पटोले यांच्या भेटीने मच्छीमार बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. आपल्या दौऱ्यात कोणतीही घाई गडबड न करता त्यांनी अभ्यासपूर्ण दौरा केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी देखील मुद्देसूद अभ्यासपूर्ण माहिती पटोले यांना दिली. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार व एकदा खासदार झालेले यांची सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याची पद्धत अनुभवता आली. कोणताही बडेजाव नसलेले नाना पटोले शांतपणे समोरच्याचे म्हणणे ऐकून घेतात, नंतरच समजून घेत योग्य उत्तर देतात. पक्ष संघटन बाबत अगदी बूथ कमिटीच्या अध्यक्षांशी देखील संवाद साधतात. नाना पटोले हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे, त्यामुळे काम करून घेणारे नेते म्हणून त्यांना मानतात.
नाना पटोले यांच्या संपूर्ण दौऱ्यात संवाद मीडियाची टीम त्यांच्या सोबत होती. नाना पटोले यांचा दौरा आणि कोणताही बडेजाव न बाळगता जनतेच्या कामासाठी हिरहिरीने काम करण्याची त्यांची पद्धत जवळून अभ्यासता आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 15 =