You are currently viewing दादांनी कधी शासनाच्या मदतीची वाट पहायला लावली नाही, ते आपदग्रस्तांना भरघोस मदत करायचे…!

दादांनी कधी शासनाच्या मदतीची वाट पहायला लावली नाही, ते आपदग्रस्तांना भरघोस मदत करायचे…!

कुठे आमचे पालकमंत्री नारायण राणे आणि कुठे आताचे मंत्री : सुरेश सावंत

कणकवली

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे अपरिमीत हानी पोहचलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकसानीच्या पहाणी दौ-यावर अनेक मंत्री आले पण एकाही मंत्र्याने जनतेच्या मदतीसाठी खिशात हात घालण्याचे धाडस केले नाही. आमचे नेते नारायणराव राणे पालकमंत्री असताना नैसर्गिक संकटाच्यावेळी दौ-यात आपदग्रस्तांना भरभरुन मदत द्यायचे. कुठे आमचे पालकमंत्री नारायण राणे आणि कुठे आताचे मंत्री. गेले ‘ते’ दिवस राहिल्या त्या आठवणी असेच म्हणायची वेळ आल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश सावंत मंत्र्यांच्या पहाणी दौ-याबद्दल बोलताना व्यक्त केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात पहाणी दौरा करताना कोणी मंत्र्याने आपदग्रस्तांना तातडीने मदत दिली नाहीच व मदतीचे आश्वासन दिले नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून सुरेश सावंत पुढे म्हणाले, अनेक वर्षे पालकमंत्री म्हणून नारायण राणेंना आमच्या दादांना पाहिले आहे. दादा गावामध्ये नुकसान ग्रस्त भागात येणार म्हणजे जनता त्यांची तासनतास वाट बघत रस्त्यावर असायची कारण दादांनी कधी शासनाच्या मदतीची वाट पहायला लावली नाही. दौ-यावर निघायच्या अगोदर रोख रक्कमेची तजविज करायचे आणि आपदग्रस्तांना भरघोस मदत करायचे असे सांगुन सुरेश सावंत यांनी त्यांच्या आठवणीतल्या दादांच्या एका दौ-याबद्दल सांगितले. सावंत म्हणाले मी स्वत: ‘तो’ दौरा पाहिला ‘तो’ पोलादपूरवरून सुरू झाला. ‘त्या’ दौ-यात राजापुर येथे पर्यंत बरोबर आणलेली रोख रक्कम गरजूंना देऊन संपली. पैसे संपल्यावर दादांनी दौरा तेथेच स्थगित केला आणि राजापूर येथील रेस्ट हाऊसला आले आणि मागविलेले पैसे येताच पुढील दौ-याला सुरूवात केली. यालाच म्हणतात, पालकमंत्री. आता देणार येणार करून दौ-यासाठी उगाचच पैसे वायफळ घालण्याचे काम हे मंत्री करत आहेत. मंत्र्यांनी यातून बोध घ्यावा असे सांगुन श्री. सावंत म्हणाले दादांच्या दातृत्वामुळे ते पालकमंत्री असोत वा नसोत दादा आपल्या गावात आले पाहिजेत अशी आठवण ग्रामस्थ काढत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − three =