You are currently viewing पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने कोविड रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत समन्वय परिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक – पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने कोविड रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत समन्वय परिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी

पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील परिचारिकांशी संवाद साधून समन्वय घडवून आणला. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी नवीन मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्ती बाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

                यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

                परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज सविस्तरपणे जिल्हा रुग्णालयात बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेतून समन्वय साधण्यात आला. खासदार श्री. राऊत यांनी आरोग्य आणि वित्त मंत्र्यांशी चर्चा करून परिचारिकांच्या नियुक्तीबाबत बैठक लावावी अशी सूचना केली. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, परिचारिकांना योग्य त्या सोयीसुविधा तात्काळ रुग्णालय प्रशासनाने पुरवाव्यात. त्यांच्या शासनस्तरावरील मागण्यांबाबत लवकरच बैठक लावण्यात येईल. त्यासाठी निश्चितच  पाठपुरावा करून सोडवल्या जातील. कामाचा ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची भरती करण्यास सुरुवात करावी, असेही ते म्हणाले.

कोविडसाठी बेड वाढवण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

                पालकमंत्री श्री. सामंत यांनी कोरोना प्रतिबंधक आणि उपाययोजनांबाबतही आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांसाठी वाढीव बेडची सुविधा करावी. मिशन ऑक्सिजन अंतर्गत जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभे करण्यासाठी संबंधित कंपन्यांशी करार करावेत. यानंतर त्यांनी आयुष्य रुग्णालयाचे सुरु असणाऱ्या बांधकामाची पाहणी करुन अभियंत्यांना सूचना केल्या.

ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करून प्राधान्याने वीज पुरवठा सुरू करा

                पालकमंत्री श्री. सामंत यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने महावितरणची आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, प्रकाशगड येथून अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन नुकसानग्रस्त भागातील वीज जोडण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. या कामात स्थानिक ग्रामस्थांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. हे कौतुकास्पद आहे. महावितरणनने उर्वरीत 26 हजार ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. खासदार श्री. राऊत यांनीही यावेळी आवश्यक असणारी साधनसामुग्री घेण्याबाबत सूचना केली.

                यावेळी मुख्य अभियंता किशोर परदेशी, अधिक्षक अभियंता इक्बाल मुलाणी, अधिक्षक अभियंता विनोद पाटील, उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 16 =