You are currently viewing बीजारोपण काळाची गरज – सदाशिव वागरे.

बीजारोपण काळाची गरज – सदाशिव वागरे.

वैभववाडी.

आज दिवसेंदिवस निसर्ग संपत्ती कमी होत चालली आहे. याची सर्व सजीवांना झळ पोहोचत आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने बीजारोपण करून सर्वांनी निसर्ग संपत्ती वाढवली पाहिजे व तिचे संवर्धन केले पाहिजे असे श्री.रासाईदेवी देवालय, आचिर्णे येथील देवराईमध्ये बीजारोपण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वैभववाडी वनविभागाचे वनपाल श्री.सदाशिव वागरे यांनी सांगितले.

सावंतवाडी वन विभाग व माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील समविचारी संस्थांच्या सहकार्याने दिनांक २२ मे या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील देवराईंमध्ये बीजारोपण करून हा दिवस साजरा करण्याचे ठरविले होते.

वैभववाडी तालुका वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी व माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रासाई देवी देवालय आचिर्णे येथील देवराईमध्ये बीजारोपण कार्यक्रम वैभववाडी वनविभागाचे वनपाल श्री. सदाशिव वागरे, सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी वनपाल श्री.पी. डी.पाटील, माउंटेनिअरिंग असोसिएशनचे सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील, अचिर्णे ग्रामपंचायत सदस्य वासुदेव रावराणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी खांबाळेचे वनरक्षक ए.एच. काकतीकर, भुईबावडा वनरक्षक व्ही.जे.पाटील, करूळ वनरक्षक यु.एस. कांबळे, समाधान वाघमोडे, सौ.व्ही.व्ही.जाधव, वनरक्षक वैभववाडी, श्री.पाताडे, श्री. मराठे, श्री.ढवण हे वनमजूर तसेच अतिश माईणकर, स्वप्निल दर्डे, सुरेश आग्रे राजाराम आग्रे इ. ग्रामस्थ उपस्थित होते.

रासाई देवी मंदिरात नारळ ठेवून बीजारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माउंटेनिअरिंग असोसिएशनचे सचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाचे महत्त्व तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी १२५ काजूबिया, १५० हेळा, शिवण १०० व कोकमच्या २०० बिया मिळून ५७५ बियांचे रोपण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =