You are currently viewing पत्रादेवी चेकपोस्टनजीक कंटेनर पलटी

पत्रादेवी चेकपोस्टनजीक कंटेनर पलटी

बांदा

गोव्यातून मुंबईकडे केबल वाहतूक करणार्‍या कंटेनर चालकाला रस्त्याचा अंदाज न झाल्याने कंटेनर पलटी झाला. पत्रादेवी पोलीस चेकपोस्टनजीक आज पहाटे हा अपघात झाला. महामार्ग ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक न लावल्याने हा अपघात झाला. अपघातात चालक व क्लीनर आश्चर्यकारकरीत्या बचावले आहेत. कंटेनरचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =