You are currently viewing नुकसान

नुकसान

उभारले कष्टाने
घरदार त्याने
डोळ्यासमोर
कोसळले
एकाच
क्षणी
ते

न थांबती अश्रूही
दुःख खोल मनी
वादळापेक्षा
माणसाचे
विचार
तेज
रे

आता काय करावे
कसे उभारावे
घरकुल रे
सतावती
हजार
प्रश्न
ते

यातना मनातील
ईश्वर चरणी
शब्दांविन रे
मांडतील
वाहते
अश्रू
ते

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =