सध्या करोना च्या काळात इम्युनिटी सिस्टीम सुधरणे फार गरजेचे आहे. अशा कठीण प्रसंगी ज्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी सिस्टीम सुधरू शकते त्याच गोष्टी प्रशासन बंद ठेवत असेल तर ते लोकांच्या हिताचे नाही.
एरवी चार तास दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देऊन प्रशासनाने जो काय कारभार चालवला आहे व त्यामुळे जी काही गर्दी बाजारपेठेमध्ये होत आहे त्याच्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव होत नाही का? असा सवाल बनी नाडकर्णी यांनी केला आहे.
अटी व शर्ती लागू करून जिल्ह्यामधील सर्व व्यायाम शाळा सुरू कराव्यात अशी मागणी लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांंनी कळवले आहे.