You are currently viewing “ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर  कोंकण प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर  कोंकण प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

“ताउक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील नागरिकांच्या संरक्षणासाठी  कोंकण विभागातील  जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच आपत्ती काळात प्रशासन सज्ज असल्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.

           मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर भयानक “ताउक्ते” चक्रीवादळात झाले आहे. याचा फटका गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. काल कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसानं कहर केला आहे. तर बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.”ताउक्ते” चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता कोंकण विभागातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 512 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहचल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 96 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत.दिघी बंदर येथे मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील 25 बोटी आश्रयासाठी आल्या आहेत.

           चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला होता.

 रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

किनारपट्टीवर धोकादायक क्षेत्रातील राजापूर आणि गुहागर तालुक्यातील नागरिकांचे स्थलांतरण झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील ८५ कच्च्या घरातील ३६५ नागरिकांचे परिसरातील           आजूबाजूच्या  घरात स्थलांतर करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज

          रायगड जिल्हा रुग्णालयातील रक्ताचा साठा आज दि.16 मे 2021, दुपारअखेरची माहिती पुढीलप्रमाणे आहे:-

व्होल ब्लड :-

A+ve= 108

A-ve= 07

B+ve= 43

B-ve= 04

AB+ve= 47

AB-ve= 03

O+ve= 124

O-ve= 06

*एकूण = 342*

◆Components

Packed Cell Volume(PCV )

A+ve= 03

A-ve=01

B+ve= 00

B-ve= 00

AB+ve= 00

AB-ve= 01

O+ve= 01

O-ve= 01

*एकूण = 07*

◆Fresh frozen Plasma:- एकूण- 250

         रायगड जिल्हा रुग्णालयातील जिल्हा रक्तपेढी जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली  पूर्णपणे सतर्क व सज्ज असल्याची माहिती जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी व रक्त संक्रमण तंत्रज्ञ श्री. हेमकांत सोनार यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + nine =