You are currently viewing कणकवली न.पं.च्या कोव्हीड केअर सेंटरचे झाले लोकार्पण

कणकवली न.पं.च्या कोव्हीड केअर सेंटरचे झाले लोकार्पण

जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते झाले उदघाटन

सुरू झाले 25 बेड चे सुसज्ज मोफत कोव्हीड केअर सेंटर

ऑक्सिजन बेडसह रेग्युलर बेडची सुविधा मिळणार

कणकवली :
कणकवली नगरपंचायत च्या मुडेडोंगरी येथील सुसज्ज मोफत कोव्हीड केअर सेंटर चे उदघाटन जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते नगराध्यक्ष समीर नलावडे, पं स सभापती मनोज रावराणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तहसीलदार रमेश पवार, मुख्याधिकारी अवधूत तावडे , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून करण्यात आले.

मुडे डोंगरी येथील पर्यटक सुविधा केंद्राच्या इमारतीत कणकवली नगरपंचायत च्या वतीने 25 बेड चे सुसज्ज मोफत कोव्हीड केअर सेंटर नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे. ऑक्सिजन बेडसह रेग्युलर बेड ची सुविधा कोव्हीड बाधित रुग्णांना या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. मनःशांती आणि मनशक्ती वाढविण्यासाठी दाखल कोरोनाबधितांसाठी योगा ट्रेनिंगही दिले जाणार आहे. स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षात बेड ची व्यवस्था करण्यात आली असून. 2 जम्बो सिलेंडरसह 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर अत्यावश्यक सुविधेसाठी तैनात करण्यात आले आहेत. रुग्णांच्या मनोरंजनासाठी एलईडी स्क्रिन उपलब्ध आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, न.पं.बांधकाम सभापती मेघा गांगण, आरोग्य सभापती अभि मुसळे, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक बाबू गायकवाड, ऍड विराज भोसले, किशोर राणे, महिला बालकल्याण सभापती प्रतीक्षा सावंत, नगरसेविका सुप्रिया नलावडे, कविता राणे, रोटरी प्रेसिडेंट लवू पिळणकर, जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ शिकलगार, डॉ. सतीश टाक, डॉ विद्याधर तायशेट्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ, शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 2 =