You are currently viewing रास्त धान्य दुकानातून पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन धान्य पुरवठा करा; मनसेची मागणी

रास्त धान्य दुकानातून पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन धान्य पुरवठा करा; मनसेची मागणी

तहसिलदारांना निवेदन : धान्य उपलब्ध असूनही वितरीत होत नसल्याने काळा बाजार होण्याची शक्यता

मालवण

शासकीय रास्तधान्य दुकानात ऑनलाईन व ऑफलाईन धान्य देण्यावरून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्‍यांनी गुरुवारी मालवण तहसिलदार अजय पाटणे यांची भेट घेत निवेदन सादर केले. फेब्रुवारी महिन्यात पुरवठा विभागाने अचानक ऑनलाईन धान्य वितरीत करण्याची सूचना दिल्याने अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित राहिली आहेत. आज गोदामात धान्य असतानाही पुरवठा विभागाच्या या निर्णयामुळे धान्याचा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांना पूर्ववतपणे ऑफलाईन स्वरूपातच धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर अध्यक्षा भारती वाघ, तालुका उपाध्यक्ष उदय गावडे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर, राधिका गावडे, विजय पेडणेकर, नंदकिशोर गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 10 =