सु. बे. कंत्राटदारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकारी, आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्याकडे सु. बे. कंत्राटदारांची निवेदनद्वारे मागणी

सु. बे. कंत्राटदारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकारी, आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्याकडे सु. बे. कंत्राटदारांची निवेदनद्वारे मागणी

कुडाळ :

कुडाळ मधील सर्व सुशिक्षित बेरोजगार (सु. बे.) कंत्राटदारांनी एकत्रित येऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद मार्फत विविध विभागाअंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन कामांमध्ये शासन निर्णय डावलून कामांच्या आरक्षणात अनियमिता प्रस्थापित करून जास्तीत जास्त कामे एका विशिष्ट गटाला कामे देत असल्याने सु. बे. कंत्राटदारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग, मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, मा. खासदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ आणि कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना निवेदन दिले. येत्या दोन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा. पालकमंत्री व कुडाळ-मालवण विधान सभा मतदार संघाचे मा. आमदार यांना निवेदन दिले आहेत.

यावेळी मंदार दामोदर, सागर भोगटे, मंदार कोठावळे, ओंकार पडते, ओंकार वाळके, सागर कोचरेकर, दत्ताराम सुद्रीक, अल्पेश रासम, मुकेश पालव, आकाश तारापुरे, संदेश म्हाडेश्वर, पूनम वारंग आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा