सावंतवाडी
लग्नाच्या वेळी जन्मोजन्मी साथ देण्याच्या आणा भाका घेतल्या जातात. चराठेतील दाम्पत्याने ही साथ मृत्यूनंतरही निभावली. अवघ्या एका आठवड्यात पत्नी पाठोपाठ पतीचेही निधन झाले. ही दुर्दैवी व धक्कादायक घटना चराठा गावात घडली. या तरुण दांपत्याच्या अकाली निधनाने चराठा गावात शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सेजल गजानन चराठकर (३९) यांचे शुक्रवारी ७ मे रोजी निधन झाले. या धक्क्यातून चराठकर कुटुंबिय सावरत असतानाच गजानन काशिराम चराठकर (४३) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. या दाम्पत्याच्या अकाली व आकस्मिक निधनामुळे चराठकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तर आई वडिलांच्या निधनामुळे दोन मुले मात्र मातापित्याच्या छत्राला पारखे झाले आहेत. नेहमी हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या या दाम्पत्याच्या निघून जाण्याने सर्वांच्याच मनाला चटका लागला असून चराठे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई – सासू ,१० वर्षीय तनिष व तनय हे दोन मुलगे, भाऊ- दिर, भावजय – जाऊ, पुतणी असा परिवार आहे