You are currently viewing खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे श्रेय शिवसेना नेत्यांनी घेऊ नये – सूर्यकांत भालेकर

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे श्रेय शिवसेना नेत्यांनी घेऊ नये – सूर्यकांत भालेकर

खारेपाटण

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत मिळालेल्या रुग्णवाहिकेचे श्रेय शिवसेना नेत्यांनी घेऊ नये, असे भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य सुर्यकांत भालेकर यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या खनिकर्म निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण 12 रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी एक रुग्णवाहिका खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली आहे. या रुग्णवाहिकेचे रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या उपस्थितीत पूजन करून रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे रीतसर सुपूर्द केल्यानंतर पुन्हा शिवसेनेच्या काही नेत्यांनी पूजन केले होते. त्या पार्श्वभूमीवर श्री. भालेकर यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाहिकांची कमतरता लक्षात घेऊन आमदार नितेश राणेसाहेब यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत मॅडम यांनी प्राधान्याने खनिकर्म निधीतून या रुग्णवाहिका अल्पावधीत जिल्ह्यासाठी उपलब्ध केल्या. त्यांनी स्वतः या सर्व रुग्णवाहिकांचे पूजन करून त्या आवश्यक तेथे वितरित केल्या. त्यापैकीच एक रुग्णवाहिका खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली.
या रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने निधी खर्च केला केला असल्याने शिवसेना नेत्यांनी याचे श्रेय घेणे हास्यास्पद असल्याचे श्री. भालेकर यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून या महामारीतून जिल्हावासियांना दिलासा मिळावा म्हणून कोणतेही राजकारण न करता राणे कुटुंबीय आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत. मात्र शिवसेना नेते अशा प्रकारची मदत करायची सोडून श्रेयवादाचे राजकारण करत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे असेही श्री. भालेकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + six =