You are currently viewing महाराष्ट्र साऊथ झोन ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धा २३ सप्टेंबरला….

महाराष्ट्र साऊथ झोन ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धा २३ सप्टेंबरला….

सावंतवाडी प्रातिनिधी 
सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत दक्षिण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र साऊथ झोन ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा बुधवार दि. २३ सप्टेंबरला होणार आहे.
यासाठी सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीचे संचालक आणि बुद्धीबळ, कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांचं सहकार्य लाभणार आहे. चेज सर्कलचे संचालक इंटरनॅशनल आर्बिटर विवेक सोहनी यांच्या आयोजनाखाली कै. अनिल जे. कानविंदे स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी एकूण रोख रक्कम दहा हजार रुपयांची ७५ बक्षिसे ठेवण्यात आलीत. जिल्ह्यातील विदयार्थ्यांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खुल्या, महिला आणि छोट्या गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंसाठी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभागी स्पर्धकांना ई-सर्टिफिकेटही देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बुद्धीबळ खेळाडूंसाठी ही मोठी पर्वणीच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धीबळपटूंंसोबत रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापुर या जिल्ह्यातील बुद्धीबळपटूंंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. अधिक माहितीसाठी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याच आवाहन मुक्ताई अॅकेडमीचे संचालक आणि बुद्धीबळ, कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =