You are currently viewing कणकवली नगर पंचायत कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा रविवारी १६ मे रोजी..

कणकवली नगर पंचायत कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा रविवारी १६ मे रोजी..

कणकवली

कणकवली नगर पंचायत कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जी. प. अध्यक्ष संजना सावंत या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, यांच्यासह कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष व नगरसेवक मुख्याधिकारी उपस्थित राहणार असून शासकीय कोरोना विषयक नियम पाळून हा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कणकवली नगरपंचायतीच्या या कोविड सेंटर ला २५ बेडची मंजुरी असून याबाबतची प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी त्यांचे आभार व्यक्त करताना समीर नलावडे म्हणाले,  या कोविड सेंटर साठी दोन डॉक्टर तीन नर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नगरपंचायत च्या माध्यमातून रुग्णांसाठी जेवण व अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या कोविड केअर सेंटर मध्ये रोटरी क्लबच्या वतीने संतोष कांबळी हे योगा विषयक ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे रुग्णांसाठी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवले जाणार आहेत. तसेच या सेंटरमध्ये वाय-फायची सुविधा दिली जाणार असून बाळा वळंजू मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व उपाध्यक्ष म्हणून मी स्वत: २४ तास ऍम्ब्युलन्स सेवा या सेंटरमध्ये उपलब्ध करून देणार आहे. त्याचप्रमाणे अत्यवस्थ रुग्णांची गरज भागविण्यासाठी २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कणकवली रोटरी क्लब व कणकवली तालुका व्यापारी बांधवांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  तसेच २ जम्बो सिलेंडर १९८५ दहावीच्या विद्यामंदिर हायस्कूल च्या बॅचने व आपण स्वतः उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या कोविड सेंटर उभारणीसाठी प्रशासकीय पातळीवर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वच जणांचे कणकवली नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आभार मानले.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभी मुसळे, विराज भोसले, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे बंडू गांगण, संदीप नलावडे उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =