वाढीव विज बिले ५० टक्के पर्यंत कमी करा..

वाढीव विज बिले ५० टक्के पर्यंत कमी करा..

वंचित बहुजन आघाडी देवगड तालुका अध्यक्ष प्रभाकर साळकर यांची निवेदनाद्वारे महावितरणच्या कार्यकारी अभियंता कडे मागणी

देवगड प्रतिनिधी
कोरोना या आजारामुळे देशात लॉक डाऊन केल्याने अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच महावितरण कंपनीकडून देण्यात आलेली सरासरी वाढीव विज बिले ही अवास्तव प्रमाणाबाहेर असून लोकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ही वीज बिले तात्काळ कमी करून ५० टक्के पर्यंत सूट देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे देवगड तालुकाध्यक्ष प्रभाकर साळकर यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी देवगड कार्यालय यांच्याकडे केली आहे.

तसेच खेडोपाड्यात विज बिल भरण्याची योग्य सोय नसून त्याची व्यवस्था त्वरित करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. तसेच हे प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा