वेंगुर्ले
म्हापण गावात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असुन गावातील वाढत्या कोरोना संक्रमणास बाहेरुन प्रवास करून येणारी मंडळी व त्यांचा गावातील नागरीकांमध्ये होणारा थेट वावर हे एक महत्वाचे कारण दिसुन येत आहे. ही बाब लक्षात घेवून कोविड – १९ संनियंत्रण समिती, म्हापण असा निर्णय घेतला आहे कि, दिनांक १५ मे २०२१ पासुन म्हापण गावात परजिल्ह्यातून प्रवास करुन येणार्या लोकांना समितीने ठरवून दिलेल्या ठिकाणी विलगीकरणात (क्वारंटाईन) राहाणे सक्तीचे करण्यात आले आहे.
शासनमान्य RTPCR चाचणी करुन त्याचा रिपोर्ट सादर करणार्या व्यक्तीस ३ दिवस व रॅपीड टेस्ट करुन येणार्या व्यक्तीस ७ दिवस क्वारंटाईन करण्यात येईल. त्यासाठी गावात येण्यापूर्वी समीतीस आगावू सुचना देणे आवश्यक असेल. विलगीकरणासाठी १. म्हापण केंद्रशाळा, २. खवणे शाळा, ३. खवणेश्वर शाळा, ४. खवणे पागेरेवाडी शाळा, ५. मळई शाळा अशा जागा सज्ज करण्यात आल्या असुन वीज, फॅन, पाणीपुरवठा याची व्यवस्था समितीमार्फत करण्यात येईल. नास्ता व भोजनव्यवस्था संबंधीतांच्या नातेवाईकांनी करावयाची आहे. या नियमांचे पालन न करणार्या व्यक्तीविरोधात समितीकडून आपल्या अधिकाराचा वापर करून आवश्यक कायदेशिर कारवाई केली जाणार आहे.
अधिक माहीती व आगावू सुचना देण्यासाठी संपर्क क्रमांक : श्री. अभय ठाकुर ( अध्यक्ष – कोविड संनियंत्रण समिती तथा सरपंच ग्रा.पं म्हापण ) मोबा. 9423511011, श्री. प्रविण परब (आरोग्यसेवक – म्हापण) मोबा. 9420741960
तरी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.