You are currently viewing एम.पी.एस.सी. परीक्षा देणाऱ्यांना उमेदवाराला मिळणार जवळचे परीक्षा केंद्र
एम.पी.एस.सी. परीक्षा देणाऱ्यांना दिलासा उमेदवाराला मिळणार जवळचे परीक्षा केंद्र.

एम.पी.एस.सी. परीक्षा देणाऱ्यांना उमेदवाराला मिळणार जवळचे परीक्षा केंद्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ची परीक्षा येत्या 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणा-या हजारो उमेदवारांना युवा सेनेच्या प्रयत्नांमुळे दिलासा मिळाला आहे.

युवा सेनेने केलेल्या मागणीनुसार या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले होते. आता ही परीक्षा येत्या 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे आयोगाने नुकतेच जाहीर केले आहे. ही परीक्षा देणारे महाराष्ट्रातील असंख्य उमेदवार हे पुण्यातील केंद्रातून नोंदणी करतात. त्यासाठी बहुसंख्य उमेदवार हे पुण्यात येऊन या परीक्षेची तयारी करतात. परंतु कोरोनामुळे हे सर्व उमेदवार आता आपापल्या गावी परतले आहेत. कोरोनामुळे परीक्षेसाठी त्यांना पुन्हा पुण्यात परतणे शक्य नसल्याने या उमेदवारांनी परीक्षा केंद्र बदलण्यासाठी युवा सेनेकडे धाव घेतली होती. उमेदवारांच्या मागणीनुसार युवा सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परीक्षा केंद्र काढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुणे विभागातील नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या परीक्षा केंद्राजवळ नोंदणी करता येणार आहे. या मागणीसाठी युवा सेनेच्या मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेक जगताप, राजन कोंळबेकर, शशिकांत झोरे आणि शीतल देवरुखकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते.

आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बदल करायचा आहे. संबंधित उमेदवारांना एसएमसद्वारे त्यांची माहिती कळविण्यात येईल. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार केंद्र निवडण्याची मुभा देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 2 =