सावंतवाडी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप लाईनचे काम पूर्ण झाल्याने आज पासून ७ व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले असून, यातील ५ व्हेंटिलेटर बेड आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहेत. ज्या प्रमाणे येथे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होतील त्या प्रमाणे अजुन बेड उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी झूम व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग द्वारे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी घाईगडबडीत येऊन कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट देऊ नये, अगोदर आपल्याकडून माहिती घ्यावी आणि त्यानंतर स्टेटमेंट द्यावी असा सल्ला केसरकर यांनी दिला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झालेल्या पाणी टंचाई आता संपली असून, त्यांना आता योग्य प्रकारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.