You are currently viewing ठाणे महानगरपालिका व प्रताप सरनाईक यांना कुशल बद्रिकेचे आभार

ठाणे महानगरपालिका व प्रताप सरनाईक यांना कुशल बद्रिकेचे आभार

ठाणे :

ठाण्यातील एका गंभीर समस्येला फेसबुक लाइव्ह द्वारे विनोदी अभिनेता कुशल बद्रिके यांनी वाचा फोडली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून कुशल बद्रिकेने ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती केली आहे व त्यावर काल रात्री उशिरा बद्रिके यांने हे लाईव्ह केले होते. आज सकाळी प्रताप सरनाईक यांनी त्या समस्येवर लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.

कुशल बद्रिके हे ठाण्यात सुरजवॉटर पार्क च्या समोर राहत असून काल रात्री वाघबिळ नाक्याजवळ जो ब्रिज रस्त्यावरून वेगळा होतो त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची सोय नसल्याने वारंवार अपघात घडतात. काल रात्री ही उशिरा येथे अपघात होऊन डंपर दुभाजकाला धडकला असल्याचे दृश्य बद्रिके यांनी दाखवले होते. त्यामुळे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याकडे लक्ष द्यावे, ही विनंती कुशल बद्रिकेने केली होती. नेहमी या ठिकाणी काही ना काही अपघात घडतात त्या अधिकाऱ्यांपर्यंत हा लाइव पोहोचावा व त्याठिकाणी रेडियम लावावा किंवा स्ट्रीट लाईट लावावा, जेणेकरून वाहनचालकांना त्याठिकाणी ब्रिज सुरू होतो हे कळेल आणि अनेकांचे त्यामुळे जीव वाचू शकतील, असे मत कुशल बद्रिके यांने व्यक्त केले होते.

त्यावर दखल घेऊन आज सकाळी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांचा कुशल बद्रिके यांना स्वतःहून फोन आला होता. त्यावेळी त्यांनी कुशल बद्रिके यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. तसेच सरनाईकजी यांनी ग्वाही दिली आहे की, लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढला जाईल व ही समस्या सोडवली जाईल. यावर बद्रिके असे म्हणाले की, आत्ताच्या covid-19 च्या परिस्थितीत सर्व ठिकाणी यंत्रणा व्यस्त आहेत. खूप अडचणी आहेत. आजूबाजूला इतरही समस्या आहेत. अशावेळी आपण सामान्य माणूस म्हणून केलेली विनंती ऐरणीवर घेतली जाते. हा राष्ट्राचा व शहराचा सकारात्मक दृष्टिकोण आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाईल, असे व्यक्त होत त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे व प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 3 =