You are currently viewing स्वर्गीय भरत बोडेकर प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी; असलदे येथील वृद्धाश्रमाला केले साहित्य वाटप

स्वर्गीय भरत बोडेकर प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी; असलदे येथील वृद्धाश्रमाला केले साहित्य वाटप

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील स्वर्गीय भरत बोडेकर प्रतिष्ठाने जपली सामाजिक बांधिलकी असलदे येथील वृद्धाश्रमास भेट देऊन वृद्धआश्रमास साहित्य वाटप केले.
वर्षभरापुर्वी लॉकडाऊन झाला त्यावेळी परिस्थिती वेगळी होती किमान लोकांना अनेक सामाजिक संस्थांची मदत मिळत होती मात्र यावेळी परिस्थिती प्रचंड खराब आहे. आपल्या समाजातील या घटकांना मदत करण्यासाठी थोडा हातभार लावुया या हेतूने स्वस्तिक फौंडेशन दिविजा वृध्दाश्रम असलदे गावठण हिथे स्व.भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान नापणे च्या कार्यकर्त्यांनी वृध्दाश्रमाला भेट दिली आणि सध्या परस्तिथिची माहिती घेऊन .कोरोना काळात नियमांचे पालन करून त्यांना जिवनाआवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या.
यावेळी स्वर्गीय भरत बोडेकर प्रतिष्ठानचे सभासद तथा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विजय कोकरे, वैभववाडी तालुका युवक आघाडी अध्यक्ष चंद्रकांत बोडेकर, महासंघाचे युवा जिल्हा संघटक अनिल कोकरे, युवा संपर्क प्रमुख हर्षद फाले, स्वर्गीय भरत बोडेकर प्रतिष्ठानचे सदस्य म्हाळु बोडेकर, विलास फाले, प्रमोद कोकरे, सुनील कोकरे, निलेश शेळके आदी उपस्थित होते,

प्रतिक्रिया व्यक्त करा