You are currently viewing जोरदार दणका…

जोरदार दणका…

सचिन वाझेंची पोलीस दलातून हकालपट्टी..

 

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुद ३११(२) (ब) अन्वये आज आदेश जारी केला आहे. त्यामुळे मोठा झटका सचिन वाझेला बसला आहे.

माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला अटक केल्यानंतर सेवेतून हकालपट्टी करण्याच्या प्रक्रियेच्या हालचालींना मुंबई पोलिसांकडून वेग आला आहे. सचिन वाझेंची शेवटची पोस्टिंग विशेष शाखेत झाली होती, त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी असल्याची मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं.

 

काही दिवसांपूर्वीच विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून सचिन वाझेंच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित कागदपत्रांची मागणी केली होती, ज्याच एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता. हे कागदपत्र सोमवारीच विशेष शाखेला सोपवण्यात आले आहेत. नंतर विशेष शाखेचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला सोपवेल आणि वाझेंवर भा. दं. वि.  1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी मागतील, अशा चर्चा होती. मात्र अखेर आता सचिन वाझेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − six =