You are currently viewing आरोग्य विभागाच्या ताफ्यात आज नवीन सहा ॲम्बुलन्स दाखल…

आरोग्य विभागाच्या ताफ्यात आज नवीन सहा ॲम्बुलन्स दाखल…

ग्रामीण भागात आरोग्य सेवेला येणार बळकटी

खनिकर्म निधीतून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ने खरेदी केलेल्या पहिल्या सहा ॲम्बुलन्स चे वितरण आज करण्यात आले.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाकडून खनि कर्म निधीतून ॲम्बुलन्स खरेदी बाबतची प्रक्रिया पूर्ण करून तातडीने सहा ॲम्बुलन्स प्राथमिक आरोग्य केंद्र सेवेत रुजू केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली, प्राथमिक आरोग्य केंद्र चौके, प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडा, प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव या प्रा आ. केंद्रांना ॲम्बुलन्स पूजन करून ,हार घालून श्रीफळ वाढवून व वाहन चालकाच्या हाती चाव्या सुपूर्द करण्यात आल्याने आज पासून सहा ॲम्बुलन्स रुग्णसेवेत दाखल केले आहेत.

ॲम्बुलन्स चे वैशिष्ट्य म्हणजे रुग्ण व ड्रायव्हर यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये कंपार्टमेंट असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णाची वाहतूक करताना वाहन चालकास कोरोना संसर्गाची असलेली भीती दूर झालेली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण सेवेच्या दृष्टीने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सदैव अग्रेसर असून यापुढेही रुग्णसेवेत कोणतीही कसूर करणार नसल्याचे प्रतिपादन अध्यक्ष संजना सावंत यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर म्हणाले कोणी कितीही टीका केली तरी आम्ही या टीकेला आमच्या विकासात्मक कामाने उत्तर देऊ असे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,सभापती शिक्षण व आरोग्य अनिशा दळवी, सभापती बांधकाम महेंद्र चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संदेश कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ॲम्बुलन्स प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सुपूर्द करण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा