You are currently viewing मनसेचे शहर सचिव आकाश परब यांनी अनेक फाउंडेशन ग्रुप व संस्थानी आश्रमाला मदत करण्याची केली मिडीयाच्या माध्यमातून विनंती.

मनसेचे शहर सचिव आकाश परब यांनी अनेक फाउंडेशन ग्रुप व संस्थानी आश्रमाला मदत करण्याची केली मिडीयाच्या माध्यमातून विनंती.

अणाव येथील संविता आश्रम मध्ये सद्य स्थितीत 123 निराधार बंधू भगिनी आहेत. त्यातील 74 महिला 49 पुरुष व 14 मुलं आहेत (वय वर्ष 3 महिने ते 18 वर्ष ). त्यातील 72 मनोरुग्ण आहेत. कुटुंब आणि समाज यांनी नाकारलेली किंवा मानसिक स्थिती बिघडली असल्याने स्वतःबद्दल काहीच आठवत नसलेल्या या माणसांना संविता आश्रमात स्वतःचा आधार मिळाला आहे. कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान नसलेल्या या आश्रमाचे सर्व खर्च लोकांनी दिलेली देणगी आणि वस्तू रूपातील मदत यावरच चालतात. त्यातही या माणसांना हाताशी घेऊन आश्रमाचे कार्यकर्ते थोडीफार शेती सुद्धा करतात. पण त्यातून येणारे उत्पन्न हे त्यांच्या गरजेसमोर अगदीच नगण्य स्वरूपाचे आहे. त्यांना दैनंदिन स्वयंपाक करण्यासाठी जवळपास 32 किलो तांदूळ व 4-5 किलो कडधान्य लागते.

सावंतवाडी तालुक्यात अनेक संस्था आहेत ज्या अडचणीच्या वेळी गरजू, निराधार लोकांना मदत करतात. असाच एक आश्रम आहे कुडाळ (अणाव) येथे आज कोरोना महामारी व लाॅकडाउन या सारख्या परीस्थिती मध्ये त्यांचे हाल होत आहेत. तरी कॄपया काही फाउंडेशन ग्रुप व संस्थानी मदत करावी, अशी विनंती सावंतवाडी शहर सचिव आकाश परब  यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − 2 =