मामा वरेरकर नाट्यगृह येथील लसीकरण केंद्राची केली पाहणी
राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पैकी ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोविड केअर सेंटरला सुपूर्द करण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा करून कोविड रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांच्या जेवणाच्या तक्रारी आमदार वैभव नाईक यांच्याकडे प्राप्त झाल्याने त्यांनी मालवण तहसीलदार यांच्याशी चर्चा करून स्वयंपाकी बदलण्याच्या सूचना केल्या. तसेच कोविड केअर सेंटर मध्ये औषधांची कमतरता भासू देऊ नका. कोविड रुग्णांची ब्लड टेस्ट करा अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानंतर मामा वरेरकर नाट्यगृह येथे सुरु करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण केंद्राची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. याठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेत आवश्यक सूचना केल्या.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, सन्मेश परब, अरविंद मोडक, प्रसाद आडवकर आदी उपस्थित होते.