You are currently viewing सुजाण पालकत्व

सुजाण पालकत्व

जागतिक सा क व्य समूह जनसंपर्क आधिकाऱ्या कडून

जगभर गाजत असलेला जागतिक साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूह, नाशिक आणि शिक्षक ध्येय साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुजाण पालकत्व या विषयावर गुरूवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 7.30 ते 9.00 या वेळात यू ट्यूब वर ऑन लाईन संवाद साधण्यात आला. या सुसंवादी चर्चासत्रात साकव्यचे (जागतिक साहित्य कला व्यक्ति विकास मंच ) संस्थापक अध्यक्ष श्री पांडुरंग कुलकर्णी डल्लास (अमेरिका ) व जयपूरच्या नामांकित बालरोग तज्ञ, स्मार्ट पेरेंटिंग तज्ञ डॉ. स्वाती घाटे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. दीड तास चाललेल्या या लाइव्ह कार्यक्रमामध्ये पालकत्वावर छान चर्चा रंगली. ती आजच्या काळात सद्य परिस्थितीवर अवलंबून असल्याने श्रोत्यांना फारच उपयुक्त ठरली. एकाच दिवसात त्या कार्यक्रमाचे व्ह्यूज लाईक, सबस्क्राइब 1.5 हजारावर गेले व 12 विविध ठिकाणा वरून कार्यशाळेसाठी मागणी आली. साकव्य समूह व शिक्षक धेय्य यांच्या ह्या उपक्रमा मुळे पालकांना चांगली माहिती मिळाल्यामुळे ते खूष झालेत. नवीन युगात सुजाण पालकत्व याची असणारी गरज व समस्यांवरील निवरणा वरील पर्याय यामुळे श्रोते व प्रेक्षक यांच्यामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले. डॉ. स्वाती घाटे जयपूर ,राजस्थान आणि श्री पांडुरंग कुलकर्णी डल्लास (अमेरिका ) शिक्षक धेय्यचे श्री. मधुकर गायदार यांच्यावर अभिनंदनाच्या फोनचा वर्षाव होत आहे व असेच कार्यक्रम जागतिक साकव्य समूह भविष्यात आयोजित करील अशी ग्वाही जनसंपर्क अधिकारी श्री. विलास कुलकर्णी यांनी दिली आहे .

This Post Has One Comment

  1. खूपच उपयुक्त असा उपक्रम आपण राबवला असून हजारो पालकांना याचा लाभ घेता आला.एका दिवसात १५०० च्या वर subscriber झाले म्हणजे ही आपल्या साठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा