You are currently viewing मिलाग्रीस हायस्कूलचे विभागीय कॅरम स्पर्धेत यश

मिलाग्रीस हायस्कूलचे विभागीय कॅरम स्पर्धेत यश

मिलाग्रीस हायस्कूलचे विभागीय कॅरम स्पर्धेत यश…

सावंतवाडी

नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. अमुल्य घाडी तर १९ वर्षांखालील गटात कु. राम फाले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर झालेली आहे.
या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा