You are currently viewing बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज १६० जणांना लसीकरण…

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज १६० जणांना लसीकरण…

जगदीश पाटील यांची माहीती; १८ ते ४५ वयोगटातील लोकांचा समावेश…

बांदा

प्राथमिक आरोग्य केंद्रात आज १८ ते ४५ वयोगटातील १६० जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
आरोग्य केंद्राला काल १६० लसींचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानुसार ऑनलाईन रजिस्टर करून आज आरोग्य केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर यांच्यासह स्वयंसेवक म्हणून निलेश सावंत, सिद्धेश पावसकर, श्री. पाटगावकर व आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते. आज कोणतीही गर्दी न करता नियोजनबद्धरित्या लसीकरण करण्यात आले. पुढील लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =