You are currently viewing कोविड रुग्णांना सेवांगणची मोफत अन्नदान सेवा योजना

कोविड रुग्णांना सेवांगणची मोफत अन्नदान सेवा योजना

मालवणात दर दिवशी १०० रुग्णांना दिला जातो सकस आहार

कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांची माहिती

मालवण :

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण संस्थेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी मोफत स्वरूपात अन्नदान सेवा योजना सुरू करण्यात आली आहे. दर दिवशी सुमारे १०० रुग्णांना ही सेवा दिला जात असल्याची माहिती सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी दिली.

मालवण कुंभारमाठ येथे शासकीय कोविड केअर सेंटर येथे दाखल होणारे रुग्ण, अन्य खाजगी रुग्णालयात तसेच होम आयसुलेशन स्वरूपात उपचार घेत असलेल्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या सल्ल्याने आहारातील घटक निश्चित करून जेवण दिले जाते. अंडी, चिकन, फळे यांचाही समावेश यात असल्याची माहिती खोबरेकर यांनी दिली.

ही अन्नदान सेवा योजना कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार रुजारीओ पिंटो, व्यवस्थापक संजय आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेवण विभाग प्रमुख वैष्णवी आचरेकर, सोनाली कोळंबकर, पंढरी सावंत, तेजस्विनी पाताडे, पूनम घुर्गे, डॉली फर्नांडिस, रुचिरा चिंदरकर, रवींद्र बागवे, धर्माजी कांबळी, भालचंद्र मळेकर यासह स्वयंसेवक म्हणून मृण्मयी खोबरेकर, युगंधा खोबरेकर आदींचा सहभाग आहे. तसेच बाबू काका अवसरे व अनेक दानशूर व सेवाभावी व्यक्तींचे योगदानही महत्वाचे आहे. असेही सांगण्यात आले.

बॅ. नाथ पै सेवांगणच्या मार्फत गेली दोन वर्षे मालवणच्या ग्रामिण रूग्णालयात दाखल झालेल्या गरजू रूग्णांना दररोज दोन वेळचे सकस जेवण त्यांच्या पथ्यानुसार डॉक्टर सल्ल्याने पुरविण्याचा अन्नदान उपक्रम चालू आहे.

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. अनेक कुटुंबे पुर्णपणे बाधित आढळू लागली. काही कुटुंबातील करते सवरते बाधित झाल्या मुळे शासकीय विलगीकरण केंद्रात दाखल झाल्या नंतर त्यांच्या व मागे राहिलेल्या बाकीच्यांच्या भुकेचा प्रश्न उभा राहिला. या पार्श्वभुमीवर मालवण ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी सूचित केल्या नुसार त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सेवांगणच्या आरोग्य विभागा अंतर्गत कोरोना बाधित व त्यांच्या कुटुंबियांसाठी अन्नदान योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.

दररोज पुर्णान्नाची सरासरी १०० ताटे या योजने अंतर्गत मोफत मालवण शहर व परिसरातील गरजू बाधितां पर्यंत घरपोच केली जातात.
वैद्यकीय सल्ल्या नुसार भात, भाजी,उसळ, डाळ, चपाती, रोज निराळे फळ, प्रसंगोपात गोड पदार्थ असा सकस अन्नाचा समावेश असतो. मागणी नुसार आठवड्यातून दोनदा मांसाहाराही समावेश असतो.

जेवण बनवण्या पासून ते व्यवस्थित पॅक करून गरमागरम वितरीत करण्या पर्यंत अत्यंत आरोग्यदायी वातावरणात व स्वच्छतेची पुर्ण दक्षता बाळगून सेवांगणचा कर्मचारीवृंद या कामात झोकून देवून कार्यरत आहे. या कर्मचारी वर्गाची कोरोना टेस्ट तसेच बहुतांश सर्वांचे लसीकरण झाले आहे.

पुज्य साने गुरूजींच्या ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या तत्वाला जागत आजतागायत या माध्यमातून सुमारे दिड हजार पुर्णान्न थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

साने गुरूजींच्या धडपडणाऱ्या या मुलांच्या अर्थात सेवांगणच्या या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी समाजातील अनेक देणारे हात मदत स्वरूपात पुढे सरसावले आहेत. देशभरातील अनेक दानशूरांनी पैसे किंवा वस्तूरूपाने सढळ हस्ते मदत करीत भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. देत आहेत. पुर्ण पणे सेवाभावीवृत्तीने चालणाऱ्या या उपक्रमाला अनेक कोरोना बाधितांनीही शुभेच्छा बरोबर देणगी देत आपले समाधान व्यक्त केले आहे. एकूणच सेवांगणच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + six =