You are currently viewing कट्टा येथील सर्वेश परुळेकर याच्या कुटूंबीयांचे आ.वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कट्टा येथील सर्वेश परुळेकर याच्या कुटूंबीयांचे आ.वैभव नाईक यांनी केले सांत्वन

आर्थिक मदत करत दिला धीर

मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील सर्वेश शिवानंद परुळेकर वय वर्षे 18 या युवकाचे अपघाती निधन झाले असून गुरुवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत परुळेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच आर्थिक मदत केली.

सर्वेश हा कामानिमित्त आपल्या मित्रा समवेत मुंबई गोवा महामार्गावरून दूचाकीने कुडाळच्या दिशेने जात होता. त्यावेळी मागून येणाऱ्या चार चाकी वाहनाची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसून तो गंभीर जमखी होत त्याचे निधन झाले.आ. वैभव नाईक यांनी कुटुंबाची विचारपूस करत त्यांना धीर दिला
यावेळी बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर, यशवंत भोजने, देवदास रेवडेकर, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, दर्शन म्हाडगूत आदि उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 6 =