You are currently viewing “रत्न गीतार्या” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

“रत्न गीतार्या” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

धायरी, पुणे – (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

रेल्वे मध्ये नोकरी करताना दौंड येथील नेने चाळीत राहिलेले गोपाळ शंकर वैद्य (अक्कलकोटकर) यांनी भगवतगीतेचा आर्यावृत्तामध्ये केलेला भावानुवाद रत्नगीतार्या नावाने त्यांचे सुपुत्र सेवानिवृत्त स्टेशन मास्तर श्री किशोर वैद्य यांनी प्रकाशित केला.

सिल्व्हर पेटल्स धायरी येथील सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन माजी बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्ष, समिक्षक, संत साहित्य अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

ऋतुपर्ण मासिकाचे संपादक, साहित्यिक श्री सुरेंद्र गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास गीता परिवाराच्या संध्या कुलकर्णी, ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा कुमठेकर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते. बाबू डिसोजा यांनी न म जोशी सरांचा परिचय करून दिला. तर सौ माधुरी वैद्य डिसोजा कुमठेकर यांनी अध्यक्ष सुरेंद्र गोगटे यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.

सौ. शोभना सुभाष जोशी यांनी स्वागतगीत म्हटले. नवीन अगरखेडकर यांनी सुरेल आवाजात गवळण सादर केली. श्री किशोर वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. वंदना किशोर वैद्य यांनी गोपाळ वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या आजोबांच्या आठवणी अंजली वाडेकर यांनी सांगून हळवे केले.

सौ. सायली धाक्रस यांनी रसाळ सूत्रसंचालन केले.

सौ माधुरी डिसोजा कुमठेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

किर्ती राय, मिलींद राय, कुमार वैद्य, प्रज्ञा मराठे, पार्थ राय यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. वैद्य परिवाराचा हा अमूल्य ठेवा असल्याने वैद्य परिवाराचे सर्व सदस्य, मुले मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + three =