तर कोविड वॉर्ड रूग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये : संदेश पारकर यांची माहिती..
कणकवली
उपजिल्हा रूग्णालयातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र कणकवली कॉलेजमध्ये हलविले जाणार आहे. तर कोविड वॉर्ड रूग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये लवकरच स्थलांतर केला जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली उपजिल्हा रूग्णालयात कोविड व इतर आजार असलेल्या रूग्णांना तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने इतर आजाराच्या रूग्णांना होणारा त्रास लक्षात घेवून शिवसेना नेते संदेश पारकर यांनी उपजिल्हा रूग्णालयाला भेट देत खा.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधला. यानंतर खा.विनायक राऊत यांनी या विषयीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या. संदेश पारकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी थेट चर्चा घडून आणत रूग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सध्या जेथे लसीकरण केंद्र आहे तेथे कोविड वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर लसीकरण केंद्र कणकवली कॉलेजमध्ये हलविण्याचे ठरविण्यात आले.