You are currently viewing देवगड तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

देवगड तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

देवगड :

 

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन देवगड तहसीलदार कार्यालयात उत्साहात पार पडला. देवगड तहसीलदार तथा परिक्षावधींन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सलामी दिली.

या सोहळ्यास माजी आम. अजित गोगटे, जेष्ठ माजी सरपंच बाळासाहेब ढोके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मुख्याध्यापक, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार, नगरसेवक, नगरसेविका शालेय विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने शेठ म.ग.हायस्कुल या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली. देवगड इंग्लिश मिडीयम स्कुल आणि हनुमान युवक क्रीडा मंडळ देवगडच्या वतीने क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धा यावेळी पार पडल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा