देवगड
जि. प. चे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस अरीफ बगदादी यांच्या आई सुग्राबी जैनुद्दीन बगदादी ( वय 96, रा. गिर्ये ) यांचे वृद्धापकाळाने गिर्ये येथील राहत्या घरी 4 मे रोजी रात्री 9 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चत 4 मुलगे, 3 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत सुस्वभावी आणि मनमिळाऊ असलेल्या सुग्राबी यांच्या निधनाने बगदादी परिवारासह गिर्ये गावावर शोककळा पसरली आहे.