जनतेवर निर्णय लादणे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींना आलेले अपयश

जनतेवर निर्णय लादणे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींना आलेले अपयश

जनता कर्फ्यु’मध्ये सर्वपक्षीय नावाखाली मनसेला गृहीत धरू नये.. राजाराम (आबा) चिपकर

वेंगुर्ला
गेले वर्षभर सत्ताधारी लोकप्रतिनिधी आरोग्याच्या प्रश्नांवर वारंवार अपयशी ठरत असल्यानेच व आलेले अपयश लपवण्यासाठी जनता कर्फ्युचा निर्णय घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यात ‘जनता कर्फ्यु’च्या नावाखाली सर्वपक्षीय बैठका होत आहेत.या बैठकांमध्ये सर्वपक्षीय नावाखाली मनसेला गृहीत धरू नये असे मनसेचे वेंगुर्ला तालुका सचिव राजाराम उर्फ (आबा) चिपकर यांनी म्हटले आहे.
कुडाळ, सावंतवाडी, कणकवली तसेच मालवण मध्ये स्थानिक सत्ताधारी पक्षाचे लोक, व्यापारी, अन्य काही ठराविक लोकांना घेवून ‘जनता कर्फ्यु’बाबत सर्वपक्षीय या ‘गोंडस’ नावाखाली निर्णय घेत आहेत. यात सर्वपक्षीय नसतात काही ठराविक तेच तेच लोक असतात. त्यामुळे असे निर्णय जनतेवर काही ठराविक लोकच लादत असतील तर जनतेने असे निर्णय का पाळावेत? राज्य शासनाचे नियम जनता कर्फ्यूला लागू होत नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींना आलेले अपयश लपवण्यासाठी तुमचे नियम वेगळे आणि राज्य शासनाचे नियम वेगळे असे असेल तर ते मनसेला मान्य नाही. म्हणूनच सर्वपक्षीय नावाखाली मनसेला गृहीत धरू नये आणि जर असे नाव लावण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे खोडून काढेल असे अमित राजाराम उर्फ (आबा) चिपकर यांनी म्हटले आहे.
आज जिल्ह्यात मनसे सारखे इतरही अन्य पक्ष आहेत.ते त्यांच्या ताकदीप्रमाणे असतीलही. त्यांच्याही सुचनाही महत्त्वाच्या असु शकतात पण असे नकरता त्यांनाही डावलुन आपल्या मनाप्रमाणे असे निर्णय होत आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य प्रश्नाबाबत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मागील कोविड काळापासुन वारंवार आवाज उठवला आहे आणि आवाज उठवत आहेत. प्रशासकीय पातळीवर मुंख्यमंत्री, आरोग्य मंत्री, त्यांचे सचिव, मुख्य सचिव यांच्याशी पत्रव्यवहार करुन आरोग्याच्या प्रश्नांवर शासनाला जाग आणण्याचे काम करत आहेत.
राज्यात कडक निर्बंध लागू होण्याअगोदर मनसे अध्यक्ष राज साहेब यांनी शासकीय यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली होती.त्यावेळी सत्ताधारी पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी कडक निर्बंध, लॉकडाऊन याला विरोध केला होता. मनसे सैनिक राज साहेबांचा आदेश पाळणारा आहे. म्हणूनच जिल्ह्यातील मनसैनिक शासकीय यंत्रणेला सहकार्य करेल.
राज्यात मुंबई, पुण्यासह १२ जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना सिंधुदुर्गात गेल्या आठ दिवसापासून होणारी रुग्णवाढ सत्ताधार्‍यांबरोबर प्रशासनातील अधिकार्‍यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. त्यामुळे गेले वर्षभर सत्ताधारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आलेले अपयश लपवण्यासाठी असे निर्णय जनतेवर लादावे लागत आहे. असे जरी असले तरी जनतेचे जीव वाचवण्यासाठी, कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मनसे राजकारण न करता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करेल शासकिय यंत्रणांना सहकार्य करेल असेही श्री चिपकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा